लक्ष्मीबाई फडतरे जीवनगौरव पुरस्कारचे वितरण

राजकुमार थोरात
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : फडतरे नाॅलेज सिटीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना के.जी ते एमबीए पर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असुन युवकांच्या प्रगतीमध्ये फडतरे नाॅलेज सिटीचा मोलाचा सहभाग असल्याचे गौरवोद्गार आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.

वालचंदनगर (पुणे) : फडतरे नाॅलेज सिटीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना के.जी ते एमबीए पर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असुन युवकांच्या प्रगतीमध्ये फडतरे नाॅलेज सिटीचा मोलाचा सहभाग असल्याचे गौरवोद्गार आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.

कळंब (ता. इंदापूर)  येथील फडतरे नॉलेज सिटी मधील फडतरे उद्योग समूहातर्फे देण्यात येणाऱ्या  कै. लक्ष्मीबाई साहेबराव फडतरे-देशमुख जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाध्ये बोलत होते. यावेळी फडतरे नाॅलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, उद्योजक राजु कुलकर्णी, कल्पेश शहा, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, उपस्थित होते.

यावेळी  थोपटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये जावे लाग होते.शहरातील  शिक्षण खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुंटूबातील मुलांना परवडणारे नव्हते. फडतरे कुंटूबाने कळंब सारख्या खेड्यामध्ये अाज शहरासारखे मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. या शैक्षणिक संकुलातुन प्रत्येकवर्षी शेकडो इंजिनिअर, विविध विषयातील पदवीधर विद्यार्थी बाहेर पडत आहेत. अनेक युवकांना राेजगाराच्या संधी मिळाल्या असून युवकांच्या प्रगतीमध्ये फडतरे कुंटूबाचा मोलाचा सहभाग असल्याचे कौतुक केले.

यावेळी विजया बळवंत कुलकर्णी (पुणे)  यांना आदर्श माता, स्वाती अरविंद शिंगाडे (पणदरे ता. बारामती)  यांना आदर्श शेतकरी महिला, डिंपल राजकुमार घाडगे (पंढरपूर)  यांना आदर्श सामाजिक कार्यकर्त्या, व अनुराधा अशोक रघुते (नागपूर) यांना आदर्श कर्तृत्वान महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ  व रोख रक्कम 25 हजार रुपये असे  पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्राचार्य संदिप पानसरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले व सारिका पानसरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कणसे यांनी केले.  

Web Title: Marathi news walchandnagar news award laxmibai fadatare