पालखी महामार्गासाठी भूर्गभातील जमीनीचे नुमने घेण्याचे काम सुरु

राजकुमार थोरात 
सोमवार, 22 जानेवारी 2018

वालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या सर्वेक्षण व भूर्गभातील खडकाचे नुमने तपासणीसाठी घेण्याचे काम सुरु झाले आहे.

देहू ते पंढरपूर दरम्यान संत तुकाराम महाराजाच्या पालखीसाठी चारपदरी महामार्ग होणार आहे. हा महामार्ग इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, बेलवाडी, लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे, शेळगाव, निमगाव केतकी, इंदापूर ,वडापूरी, बावडा, सराटी गावातून जाणार आहे. हा रस्ता चारपदरी (फोर लेन) होणार असून सध्याचा राज्यमार्ग हा दोन पदरी आहे.

गरज असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हीस रोड करण्यात येणार आहे. या रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम सध्या जोरात सुरु आहे. तसेच सर्वेक्षणाबरोबर ज्या जागेमधून महामार्ग जाणार आहेत. त्या परीसरामध्ये दोन इंच रुंदीमध्ये 50 फुट खोल विंधनविहीर खोदून माती, दगड व खडकाचे  नुमने घेण्याचे काम सुरु आहे. याचा उपयोग महामार्ग करताना होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकराणाचे पुणे कार्यालयाचे गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संत तुकाराम महाराज पाखली महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरु असून सहा महिन्यामध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Marathi news walchandnagar news palkhi path