पावसाच्या तुरळक सरींची शहरात आज शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 10) मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण अनुभवायला मिळणार असून, काही भागात हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुण्यात दिवसभर ढगाळ हवामान होते. शहरात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. 

कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. राज्यात भिरा येथे 40 अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले गेले, तर पुण्यात 35.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. गेल्या काही दिवसांपासून शहरात काहीसे ढगाळ वातावरण होते. कमाल तापमानाचा पारा 35 ते 36 अंश सेल्सिअसवर होता, तर किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअसदरम्यान होते. 

Web Title: marathi news weather pune