तरुणाईचा स्वैराचार तळेगावात डोकेदुखी

गणेश बोरुडे
शुक्रवार, 9 मार्च 2018

तळेगाव स्टेशन : गेल्या आठवड्यातील गोष्ट असेल. भररस्त्यावर मध्यरात्री एकमेकांवर अंडी फेकून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचा अजब प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. असे प्रकार चौकाचौकांतून रात्री-अपरात्री पाहायला मिळतात. कॉलेज कॅम्पस, सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर खुलेआम सुरू असलेले ‘ओपन बार’ तसेच धांगडधिंगा घालून वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचे युवकांतील वाढते फॅड नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या स्वैराचारावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पुणे-मुंबईसारखे वाढदिवस सेलिब्रेशनचे ट्रेंड आता तळेगावसारख्या भागातही रुजू पाहत आहे. ‘मॉर्निग वॉक’ला जाणाऱ्या मंडळींना केकची मोकळी खोकी, प्लॅस्टिकचे ग्लास, कोल्ड्रींक तर कधीकधी बिअरच्या मोकळ्या बाटल्यांचे ओंगळवाणे दर्शन होते. यातून सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक शांततेचा भंग होतो. रात्री बाराच्या ठोक्‍याला टोळके जमवून मित्राचा वाढदिवस साजरा करताना युवकवर्ग सामाजिक भान हरपत चालला आहे. पार्सल घेऊन उघड्यावर बाटल्या रिचविणारे तळीराम ‘ओपन बार’च्या नावाखाली सेलिब्रेशनचा अनोखा पायंडा पाडत आहेत. त्यातून सार्वजनिक सुरक्षा तर धोक्‍यात आली आहेच त्याहीपेक्षा युवावर्गामध्ये संघटित गुन्हेगारीची लागण होत आहे. 

वाढदिवस म्हणजे सेलिब्रेशन. सेलिब्रेशन म्हणजे मद्य-मस्ती आणि बीभस्तपणा. वाढदिवस साजरा करताना तोंडाला केकची क्रीम फासणे, अंडी फेकून मारणे, बर्थडे बंम्प्स आदींतील बीभत्सपणा नागरिकांना त्रासदायक ठरतो आहे. त्यावर काही आक्षेप घेतल्यास अंगावर धावून येण्यापर्यंत तरुणाईची मजल गेली आहे.

सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे, बंदी असलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
- मुगुटराव पाटील,  पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे

Web Title: marathi news yourth talegaon