मराठी संशोधकाने दिल्लीतील धुक्याचे उकलले गूढ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

राजधानी नवी दिल्ली गेल्या अनेक वर्षांपासून दाट धुक्याच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांबरोबरच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही फटका बसत आहे. हे धुके दाटण्याची वरवरची कारणे दिली जात असली तरी त्याचे खरे गूढ उकलण्यात मराठी संशोधकाला यश आले आहे.

पुणे - राजधानी नवी दिल्ली गेल्या अनेक वर्षांपासून दाट धुक्याच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांबरोबरच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही फटका बसत आहे. हे धुके दाटण्याची वरवरची कारणे दिली जात असली तरी त्याचे खरे गूढ उकलण्यात मराठी संशोधकाला यश आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेन्नईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी मद्रास) सहयोगी प्राध्यापक डॉ. सचिन गुंठे यांच्या नेतृत्वाखालील संशोधक गटाने दिल्लीतील धुक्याला ‘क्लोराईड’ प्रचूर कणांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत असल्याचे सिद्ध केले आहे. ‘नेचर जिओसायन्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित या संशोधनात संशोधक विद्यार्थी सुभा राज, उपासना पांडा, अमित शर्मा आणि इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठाचा इघॉन डर्बीशायर यांचा समावेश आहे. हा अभ्यास जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, अमेरिकेच्या हार्वड हार्वर्डविद्यापीठ, जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या साह्याने करण्यात आला. 

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घसरले; पुणे जिल्ह्यात मृत्यूदर दोन टक्क्यांवर 

मुळचे जळगाव जिल्ह्यातील असलेल्या डॉ. गुंठे यांचे शिक्षण नाशिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले. पुढे त्यांनी पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) पीएच.डी. केली.

Coronavirus : खासगी रुग्णालयाच्या बिलासाठी काढले कर्ज 

असे झाले संशोधन...

  • दिल्लीतील सापेक्ष आर्द्रता, तापमान आणि अतिसूक्ष्म कण अर्थात पीएम २.५ ची रासायनिक रचना व गुणधर्म मोजण्यात आले.
  • परदेशी विद्यापीठाकडून आणलेली अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात आली. 
  • हवेत ‘पीएम २.५’चे वस्तुमान कमी आणि क्लोराईडचे प्रमाण जास्त. 
  • या परिसरात अमोनिया वायूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे.
  • हवेतील हायड्रोक्लोरिक ॲसिड (क्लोराईड कण) आणि अमोनिया एकत्र येऊन ‘अमोनिअम क्लोराईड’ बनवतात. ‘अमोनिअम क्लोराईड’सारख्या ऐरोसोल कणांमध्ये पाणी शोषून धरण्याची क्षमता सर्वाधिक.
  • क्लोराईड कणांचे वाढलेले आकारमान आणि शोषलेले पाणी यामुळे दिल्लीत दाट धुके तयार होते.

‘आरटीई’ नोंदणीला शाळांचा थंडा प्रतिसाद 

धुके कमी करण्यासाठी...

  • हायड्रोक्लोरिक ॲसिड उत्सर्जित करणारी प्रक्रिया किंवा स्रोत हवे
  • कचरा डेपो, शेकोटी पेटविताना प्लॅस्टिक जाळण्यावर प्रतिबंध आवश्यक
  • ई-कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक

दिल्लीच्या हवेत ‘क्लोराईड’च्या कणांचे अंश मोठ्या प्रमाणावर सापडले. ‘क्लोराईड’चा थेट संबंध दाट धुक्याशी आहे, हे सिद्ध करण्यासाठी रासायनिक विश्‍लेषण केले. उघड्यावर जाळण्यात येणारे प्लॅस्टिक आणि औद्योगिक प्रक्रियांतून उत्सर्जित होणाऱ्या हायड्रोक्लोरिक ॲसिडवर बंधने घालणे आवश्यक आहे.
- डॉ. सचिन गुंठे, सहयोगी प्राध्यापक, आयआयटी मद्रास

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi researcher delhi fog dr sachin gunthe