मानकरवाडी मध्ये उपसरपंच उमेदवारीवरून दोन गटात मारामारी

राजकुमार थोरात
शनिवार, 23 डिसेंबर 2017

वालचंदनगर : मानकरवाडी (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये व नुकत्याच झालेल्या उपसरपंचपदाचा उमेदवार उभा करण्याच्या कारणावरुन दोन गटामध्ये मारामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन्ही गटातील अकरा जणावर गुन्हा दाखल केले आहेत.

 पहिल्या गटातील तानाजी बापुराव अनपट (वय ४८, रा. मानकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार निलेश वाल्मिक यादव, वाल्मिक पांडुरंग यादव, दिनेश सुरेश यादव, सचिन सुरेश यादव, महेश वाल्मिक यादव, सुरेश पांडुरंग यादव (रा. सर्वजण, मानकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्या गटातील राधा वाल्मिक यादव (वय ४०, रा. मानकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार तानाजी बापूराव अनपट, सदाशिव बापूराव अनपट, बलभिम बापुराव अनपट, मारुती अनपट, सचिन अनपट (रा.सर्वजण,मानकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानकरवाडी १७ डिसेंबरला उपसरपंचाची निवडणूक पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी उमेदवार उभा करण्याच्या कारणावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला होता. गावातील नागरिकांनी सांमज्यस्यानी हा वाद मिटवला. मात्र गुरुवार २१ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑक्टोबर मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक व उपसरपंचाचा उमेदवार उभा करण्याच्या कारणावरुन मारामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील अकरा जणावर गुन्हा दाखल केला आहे. तपास साहय्यक फौजदार प्रभाकर बनकर व हवालदार वसंत वाघोले करीत आहेत.

Web Title: Maratrhi news fight between two groups in valchandnagar