...म्हणून मार्बल व्यावसायिक आलेत अडचणीत

marbal.jpg
marbal.jpg

आंबेगाव (पुणे) : अगदी घरातील टाइल्सपासून ते व्हाइट मार्बलची मंदिरे, तुळशी वृंदावने तसेच इतर शोपीस आणि मार्बल, ग्रेनाईटस यांचा पुरवठा करणारे व्यावसायिक आता हवालदिल झाले आहेत. आंबेगाव परिसरात हे व्यावसायिक मोठया प्रमाणावर आहेत. या  व्यावसायिकांनी पहिले जो माल पुरवठा बिल्डर व इतरांना केला आहे. त्याची बिल अजून आली नाहीत व येण्याची चिन्हही कमी आहेत, तर या व्यवसायात कुशल कारागिर आवश्यक असतात जे सध्यातरी परराज्यात आपापल्या घरी आहेत. त्यामुळे एखादे नवीन काम आले तरी ते करावे कसे? असा गहन प्रश्न या व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच काहींनी मालाच्या किमतीही घटवल्या आहेत. तरी ग्राहक दुकानात यायला तयार नाही अशा तब्बल तिहेरी संकटात आपण सापडल्याचे हे व्यावसायिक सांगत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्यवसाय सुरू झाला खरा पण आता डोक्यावर देण आहे, दुकानाच भाड आहे, घर खर्च आहे हे सगळ भागवायचे कसे? असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे. अनलाॅकला जवळपास महिनाभराचा काळ पूर्ण होत आला आहे. तरी नवीन ग्राहकांचा पत्ता नाही. अगदी मार्बल, ग्रेनाईटस्चा माल उचलून ठेवण्यापासून ते एखादी वस्तू बनवण्यापर्यंत फक्त कुशल कारागीर आणि कामगारच हवे आणि सध्या तरी ते हाताशी नाहीत अशा परिस्थित आम्ही सध्या कराव तरी काय? असा प्रश्न विचारत आमच्याकडेही शासनाने लक्ष दयावे अशी विनंती हे व्यावसायिक करत आहेत.

" सध्या आमचे व्यावसायिक बांधव अडचणीत आहेत. थकलेली बील अडकली आहेत. कुशल कारागीर उपलब्ध नाही. तसेच खर्च भागवायचे कसे ?अश्या स्वरुपाचे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. हे सर्व पाहता शासनानेही आता या विषयात लक्ष दयावे" .

- सोहन जुरिया, अध्यक्ष, पुणे मार्बल टाईल्स असोसिएशन.


"मी या व्यवसायात गेली १५ वर्षे आहे. व्हाइटमार्बल, ग्रेनाईट यांच्यापासून घरातील मंदिरे तसेच इतर शोभेच्या वस्तू बनवणे हे आमचे काम आहे. आता जी परिस्थिती आहे अशी परिस्थिती यापूर्वी कधीही मी पाहिली नाही मालाची किंमत कमी करून देखील विक्री होत नाहीये. खर्चाचा ताळमेळ बसवणे आता अवघड होत चालले आहे. दुकानाच भाड व इतर खर्चही आता डोक्यावर आहेत. या परिस्थितीत एक दोन ग्राहक आले तरी मोठी गोष्ट आहे ".

मैनोद्दीन शेख, व्यावसायिक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com