बाजार समितीकडूनच आंब्‍याची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - पहाटे पाच वाजता बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो... वाहतूक कोंडीचे कारण देत मला पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यास सांगण्यात आले... सकाळचे दहा वाजले तरी आत गाडी नेता आली नाही.... रत्नागिरी येथील आंबा उत्पादक योगेश महल हतबलता व्यक्त करीत होते. त्याच वेळी बाजार आवारात ठिकठिकाणी उभ्या केलेल्या रिकाम्या वाहनांकडे बाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. 

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा दावा बाजार समिती प्रशासन नेहमीच करीत असते. आंब्याच्या हंगामात आवक वाढल्यानंतर वाहतूक कोंडी होते. त्यासाठी गुरांच्या बाजाराजवळ भव्य शेड उभी केली, पण या शेडचा अद्याप उपयोगच झाला नाही. बाजार समितीने शेड उभी केली, पण तेथे सपाटीकरण केले नाही, असा दावा आंब्याचे व्यापारी करीत आहेत. सध्या कोकण आणि कर्नाटकातून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आवक वाढण्याचा अंदाज असून, योग्य नियोजन नसल्याचा फटका आंबा उत्पादकांना बसत आहे. बाजार आवारात आंब्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा नसल्याचे कारण देत समितीच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहने मुख्य प्रवेशद्वारावर थांबविली. दुपारनंतरच या वाहनांना प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. 

एकीकडे मुख्य प्रवेशद्वारावर आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या असतानाच, बाजार आवारात अनेक ठिकाणी रिकामी वाहने उभी होती. या वाहनांना बाहेर काढणे किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगा न उगारता शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचे चित्र दिसून आले. 

Web Title: market committee mango farmer