वाघोलीमध्ये बाजाराचे शेड भुईसपाट तर पिकांचे...

नीलेश कांकरिया
गुरुवार, 4 जून 2020

लॉकडाउनपूर्वी येथे दैनंदिन बाजार भरत होता. त्यासाठी तात्पुरते शेड शेतकऱ्यांनी उभारले होते. हे सर्व शेड बुधवारी भुई सपाट झाले.

वाघोली (पुणे) : निसर्ग चक्रीवादळाचा फटका वाघोली व परिसराला बसला. काही जाहिरातीच्या कमानी रस्त्यावर पडल्या तर बाजार मैदानातील दैनंदिन बाजाराचे तात्पुरते शेड भुई सपाट झाले. परिसरातील शेतीचेही नुकसान झाले. वाघोली केसनंद मार्गावरील जाहिरातीची कमान रस्त्यातच आडवी झाल्याने रस्ता काही काळ बंद झाला होता. पोलिसांनी ही कमान हटवून रस्ता सुरळीत केला.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

काहींच्या घराचे पत्रेही उचकटले. बहुतांश ठिकाणी फ्लेक्सचे कापड फाटून ते लटकत होते. ते अनेक ठिकाणी विजवाहक तारांवर पडल्याने तारा तुटल्या. दर पावसाळ्यात होंर्डिंगचा सांगाडा कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र बुधवारी हे सांगाडे सुदैवाने कोसळे नाहीत.. केवळ त्यावरील फ्लेक्सचे कापड फाटले. लॉकडाउन पूर्वी दैनंदिन बाजार भरत होता. त्यासाठी तात्पुरते शेड शेतकऱ्यांनी उभारले होते. हे सर्व शेड बुधवारी भुई सपाट झाले.

पुण्यातील काही उद्याने उघडली; पण...

सध्या या ठिकाणी बाजार भरत नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सखोल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. झोपडपट्टी धारकांचे काही प्रमाणात हाल झाले. पत्रे उडून जाण्याची भीती होती. मात्र अशी किरकोळ घटना घडली. बांधकाम साईटवर पत्र्याच्या शेड मधेच मजूर राहतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र हे मजूर निघून गेल्याने ती हानी टळली. मांजरी, वाडेबोल्हाई, कोलवडी, बकोरी, अष्टापूर, आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तेथेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: market shed is flat and crop damage in wagholi