Slum Fire ambedkarnagar market yard
Slum Fire ambedkarnagar market yardsakal

Market Yard Fire : मार्केट यार्डातील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग; चार झोपडय़ा जळून खाक

मार्केट यार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली क्रमांक 11 मध्ये शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली.

बिबवेवाडी - मार्केट यार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली क्रमांक 11 मध्ये शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमध्ये चार झोपडय़ा पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, शेजारील आठ झोपडय़ांना आगीची झळ बसली आहे. आगीमध्ये एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे, चार सिलेंडर बाहेर काढले आहेत.

नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दलाचे गंगाधाम, कात्रज, कोंढवा व मुख्य कार्यालयातील आठ बंब आग विझविण्यासाठी आले, एक तासात आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली, आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही, एक नागरिक सिलिंडर बाहेर काढताना झालेल्या स्फोटात जखमी झाला.

आंबेडकरनगर मधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गल्ली नंबर 11 चारच्या सुमारास भिमा शंकर तंबाके यांच्या घरातून आग लागली त्यामुळे शेजारील अक्षय नामनूर, हणमंत कोतले, रामचंद्र बनसोडे, तानाजी चव्हाण, खंडू चव्हाण यांच्या झोपडय़ांना आग लागली, आगीत एका सिलेंडरचा स्फोट झाला.

सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी इतर झोपडय़ां मधील गॅस सिलेंडर बाहेर काढत होते त्यावेळी रावसाहेब भिसे वय 46 हे सिलेंडर बाहेर काढत असताना त्यांच्या समोर गॅस सिलेंडर फुटला, भिसे खाली बसले त्यामुळे भिसेच्या पाठीला व हाताला भाजले त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.

आग लागली त्यावेळी भीमा शंकर तंबाके यांच्या घरी कोणी नव्हते घर बंद होते त्यामुळे आगीचे कारण समजले नसल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले. आगीत घरातील मुलांचे शाळेचे साहित्य, कपडे, पगाराचे पैसे, सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे सुषमा कोतले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com