Crime News : मार्केट यार्ड परिसरात तरुणावर हत्याराने वार, गुंड नयन मोहोळसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

पूर्ववैमनस्यातून गुंड नयन मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. ही घटना मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात घडली.
Murderer Attack
Murderer Attackesakal

पुणे - पूर्ववैमनस्यातून गुंड नयन मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. ही घटना मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघे पसार झाले आहेत.

संतोष वामन भरेकर (वय ३७, रा. काकडे वस्ती, कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरेकर याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ऋतिक संजय मोहोळ आणि ओम प्रताप पवार (दोघे रा. हमालनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर नयन भाऊसाहेब मोहोळ (रा. हमालनगर) आणि निखिल बाबर पसार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरेकर आणि गुंड मोहोळ यांच्यात जुना वाद आहे. भरेकर शुक्रवारी (ता. २३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गंगाधाम फेज दोन परिसरातून जात होता. त्यावेळी मोहोळ आणि साथीदारांनी त्याच्या डोक्यावर हत्याराने वार केले. यात भरेकर गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल जाधव करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com