Parking : मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजारात पार्किंगसाठी रस्त्यावर ताबा

गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजारात सर्व्हिस लेनमध्ये ठरवून दिलेल्या जागेत पार्किंग शुल्क वसुलीचे आदेश आहेत.
Market Yard Parking
Market Yard ParkingSakal

मार्केट यार्ड - गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजारात सर्व्हिस लेनमध्ये ठरवून दिलेल्या जागेत पार्किंग शुल्क वसुलीचे आदेश आहेत. परंतु बाजारातील गेट क्रमांक पाच जवळील रस्त्यावर पार्किंगसाठी ठेकेदाराने थेट अर्ध्या रस्त्यावर ताबा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्ध्या रस्त्यावर दुचाकी पार्किंग करून शुल्क वसुली सुरू आहे. यामुळे शेतमालाच्या वाहनांसह इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र बाजार समितीचे दुर्लक्ष आहे.

गुळ-भुसार बाजारातील गेट क्रमांक तीन पासून नजीक असलेल्या प्रविण मसाले समोरील सर्व्हिस लेनमध्ये दुचाकी पार्क केल्या जातात. या दुचाकींचा पार्किंग ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने मागील अनेक दिवसांपासून वाहतुककोंडीचा विडा उचलला आहे. अर्ध्या रस्त्यावर ताबा मारत दुचाकीचा ठेका चालविण्यास सुरूवात केली आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने रस्ता अडवणूक करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणाच्या आशिर्वादने हे सुरू आहे असा प्रश्न बाजारातील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या रस्त्याने फळे, भाजीपाला, कांदा,बटाटा, केळी आदी विभागात शेतीमाल खाली करून वाहने जातात. तीन नंबर गेटजवळच या ठेकेदाराने रस्ता अडविल्याने बाजारात वाहतुककोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहनांसह बाजारात खरेदीसाठी येणार्‍या वाहनांनादेखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून पार्किंग ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असताना बाजार समिती त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

रस्त्यावर वाहने लावून पार्किंग शुल्क घेतले जात असल्यास ठेकेदाराला नोटीस दिली जाईल. गुळ-भुसार बाजारातील प्रविण मसाले समोरील सर्व्हिस लेनमध्येच पार्किंगचे पैसे घेतले पाहिजेत.

- बाबासाहेब बिबवे, विभाग प्रमुख, सुरक्षा व अतिक्रमण

ठेकेदार रस्त्यावर पार्किंग करून. त्यामुळे अर्धा रस्ता बंद होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. इथे असणाऱ्या भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दररोज या ठिकाणी वाद निर्माण होतात. समितीने तातडीने लक्ष द्यावे.

- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com