
मार्केट यार्ड(पुणे): गुलटेकडी मार्केट यार्डासह उपबाजारात फळे आणि भाजीपाल्याची नियमित आवक सुरू झाली आहे. मंगळवारी मुख्य बाजारासह उपबाजारात एकूण ६९२ गाड्यांची आवक झाली. तर भुसार बाजार साधारणतः १०० गाड्यांची आवक झाली. बाजार समितीच्या उत्तम नियोजनामुळे गुळ भुसार, फळे, भाजीपाला विभाग नियमित सुरू झाले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र धान्य, फळे आणि भाजीपाला उपलब्ध आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मंगळवारी मोशी येथील उपबाजारात ११० गाड्या, मांजरी येथील उपबाजारात १३२ गाड्या तसेच खडकी येथील उपबाजारात २० गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मुख्य बाजार आणि उपबाजारात मिळून १९ हजार ९९० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारात टप्प्याटप्प्याने खरेदीदार, अडत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. बाजारात पट्टे आखून देण्यात आले आहेत. मास्क घालून सर्व व्यवहार तसेच पुरेशी सुरक्षा बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अडते, खरेदीदार, टेम्पोचालक यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड भाजीपाला आणि कांदा-बटाटा तसेच फळ विभागाचे कामकाज सुरू सुरू आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात समितीला बऱ्या पैकी यश आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद
मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागाचे काम नियोजनानुसार टप्याटप्याने सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती अडत्यांनी शेतकऱ्यांना देऊन किमान महिनाभर मर्यादित शेतीमाल मागवावा. बाजार आवारातील सर्व घटकांनी गाळ्यावर काम करताना किमान तीन फुट अंतर ठेवावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
अडते संघटनेकडून कामकाज
करोना प्रादुर्भावामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेकडून ३१ मार्चपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारपासून (ता.१ ) पुन्हा व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहे. मंगळवारी भाजीपाला विभागातील कामकाज सुरू होते. बुधवारी फळे आणि कांदा-बटाटा विभागाचे कामकाज सुरू राहणार असून पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत कामकाज सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.