"व्हॅलेंटाइन डे'साठी बाजारपेठा "गुलाबी' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - काय आवडत असेल "तिला' अन्‌ "त्याला'? कोणती वस्तू घेऊ?.... मनाला सुखावणाऱ्या भावनांबरोबरच वाटणारी थोडीशी धडधड सांभाळत अनेकांनी आपल्या "व्हॅलेंटाइन'ला भेट देण्यासाठी आज भेटवस्तूंच्या दुकानांत गर्दी केली होती. रोमॅंटिक स्वर गुंफणारी शुभेच्छापत्रे, लव्ह टेडी बीअर्स, लव्ह बर्डस्‌ तसेच गुलाबी ते लाल रंगांच्या विविध छटांनी सजलेल्या घडाळ्यांनी बाजारपेठा फुलल्या होत्या. या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी आज दुकानांमध्ये प्रियकर-प्रेयसींची गर्दी झाली होती. आपल्या प्रेमासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करायला तरुणाई तयारीला लागली आहे. 

प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रियकर-प्रेयसीच नव्हे, तर आपापसांत या दिवशी आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यांच्यासाठी विविध वस्तूंनी "व्हॅलेंटाइन डे'निमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत. 

व्हॅलेंटाइन वेगळ्या ढंगाने, वेगळ्या रंगांनी साजरा करण्यासाठी तरुणांची जोरदार तयारी सुरू असून, बाजारात विविधरंगी शुभेच्छापत्रे आली आहेत. तरुणाईचा "मराठी शुभेच्छापत्रांकडे' मोठा ओढा असल्याचे शुभेच्छापत्र विक्रेत्यांनी सांगितले. यंदा संगीतमय शुभेच्छापत्रांचीही मोठी चलती असून, शुभेच्छापत्रांची घडी उलगडताच "रोमॅंटिक' धून ऐकवणारी शुभेच्छापत्रे तरुणांच्या मनाला भावत आहेत. याशिवाय "लव्ह टेडी बीअर्स', "लव्ह बर्डस्‌', "लव्ह स्टिक्‍स हार्ट', "लव्ह रिंग पॉकेट' सुंदर टेडीबेअर हातात घेतल्यावर ऐकू येणारी धून, "आपल्या' व्यक्तीचे छायाचित्र तितक्‍याच नाजूकतेने जपण्यासाठी असलेल्या विविध आकारांतील फ्रेम, हृदयाचा आकार असलेली घड्याळे, हार्ट शेप फुगे, की-चेन अशा नानाविध वस्तूंमुळे बाजाराला "व्हॅलेंटाइन फिवर' आला आहे. 25 रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंतच्या विविध भेटवस्तू बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. प्रेमाचा आणि गुलाबी रंगाचा जवळचा संबंध आहे. तेच ध्यानात घेऊन विविध घड्याळ कंपन्यांनीही खास गुलाबी ते लाल रंगांच्या छटांचे पट्टे असलेली घड्याळे विक्रीसाठी ठेवली आहेत. त्यांच्या किमतीही हजाराच्या पुढे आहेत. 

भेट वस्तू विक्रेते शशिकांत शिगवण म्हणाले, ""चॉकलेट, भेटकार्ड, सॉफ्ट टॉइज, सोनेरी आणि खड्यांच्या भेटवस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. भेटकार्डनाही मागणी होती. सध्या "व्हॅलेंटाइन डे' ही संकल्पना फक्त प्रियकर-प्रेयसींपुरती मर्यादित राहिलेली नसून, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांमध्येही प्रचलित आहे. याचाच विचार करून कंपनीने नवी उत्पादने बाजारात आणली आहेत.'' 

Web Title: Markets full for Valentine's Day

टॅग्स