

Pune News
sakal
पुणे : वधू-वर शोधणाऱ्या कुटुंबांना लक्ष्य करून काही विवाह मंडळांकडून संगनमताने फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एकाच वधूचा फोटो वापरून विविध नावांनी बनावट बायोडेटा तयार करून इच्छुकांना पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. शुल्क आकारून त्यानंतर कोणत्याही सुविधा न पुरवणाऱ्या या मंडळांविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.