वरातीसारख्या प्रथांना आवर घाला - वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पारगाव - ‘‘सामुदायिक विवाह सोहळ्यातून पैशाची आणि वेळेची बचत होते; परंतु रात्री वरातीवर भरपूर खर्च केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत वरातीचे स्वरूप बदलत असून त्यातून तरुण व्यसनाधिनतेकडे वळत आहे. अशा प्रथांना वेळीच आवर घातला पाहिजे,’’ असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

माजी आमदार, सहकार महर्षी (स्व.) दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पारगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकर साखर कारखाना व मुक्तादेवी सामुदायिक विवाह सोहळा मंडळ यांच्या वतीने शनिवारी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात २६ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यांना शुभेच्छा देताना वळसे पाटील बोलत होते. या वेळी माजी सभापती आनंदराव शिंदे, लक्ष्मीकांत खाबिया, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कार्यालयीन अधीक्षक रामनाथ हिंगे, सरपंच आशा ढोबळे, उपसरपंच भाऊसाहेब ढोबळे, सोनबा ढोबळे, नामदेव पुंडे, रामचंद्र ढोबळे, अनिल वाळूंज, दत्तात्रेय वाव्हळ, रामकृष्ण पोंदे, कैलासबुवा काळे उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या कार्यामुळे तालुक्‍यात आमूलाग्र बदल झाला. उसाचा दर असो की सामाजिक काम भीमाशंकर कारखाना कायम आघाडीवर राहिला आहे. सर्वसामान्यांवर लग्नानिमित्त पडणारा आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी कारखान्याने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुढील वर्षीही याचे आयोजन करण्यात येणार आहे.’’ 

बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढोबळे, जिल्हा दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे व घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांची भाषणे झाली. कुंडलिक ढोबळे व सुरेश ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: marriage rally control dilip valse patil