लाॅकडाऊनमध्ये साधता येणार लग्नाचा मुहूर्त

Marriage will happen on decided date and time in lockdown
Marriage will happen on decided date and time in lockdown

पुणे : शनिवार-रविवारी विकेंडला कडक लाॅकडॉऊन असला तरी ज्यांचे लग्न ठरलेले आहेत अशांना हा शुभ मुहूर्त साधता येणार आहे. यामध्ये ५० जणांच्या उपस्थितीत व पोलिसांच्या परवानगीने मंगल कार्यालयात लग्न समारंभ घेता येतील असे स्पष्टीकरण पुणे महापालिकेने दिले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने दररोज हजारो रुग्णांची भर पडत आहे. २०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी (ता.४) घेतला. यामध्ये शुक्रवार शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाउन असेल. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने ही पावले उचलली असली तरी याचा फटका लग्न समारंभास बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नियमांचे पालन करून लग्न करता येतील असे नमूद केलेले आहे. मात्र शनिवार-रविवारी कडक लाॅकडाऊन असताना या काळातील लग्नसमारंभाचे काय होणार याबाबत स्पष्टता नाही. 

एप्रिल महिन्यामध्ये २४ ला शनिवारी आणि २५ ला रविवार आहे. या दोन्ही दिवशी लग्नाचा मुहूर्त असल्याने शहरातील बहुतांश मंगल कार्यालयामध्ये बुकिंग झालेले आहे. लग्नपत्रिका देखील छापून झाले असून सर्व तयारी झालेली असताना या निर्बंधांमुळे लग्न होणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही मंगल कार्यालय चालकांनी नागरिकांना फोन करून शनिवार-रविवारी लग्न करणे शक्य नाही, त्यामुळे तुम्ही तारखा बदलून घ्या असे फोनही केले आहेत. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. 

तेजस पानवेलकर म्हणाले, आमच्या घरामध्ये 24 आणि 25 या दोन्ही दिवशी लग्नकार्य आहे. मंगल कार्यालय बुक केले असून लग्नपत्रिका  छापल्या आहेत. आठवड्याच्या शेवटी लाॅकडाऊन असल्याने लग्न करता येईल का नाही याबाबत स्पष्टता नाही. मंगल कार्य चालकांकडून या दिवशी लग्न न झाल्यास तारखा बदलून घ्याव्यात असे सांगितले आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करून 50 जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण येणे गरजेचे आहे. 

लाॅन्स असोसिएशनच्या अरुणा ढोबळे म्हणाल्या, "शनिवारी आणी रविवारी लग्नाच्या तारखा आहेत, मंगलकार्य बुक झाले आहेत. पण या कडक लाॅकडाऊनमध्ये लग्न करता येतील का याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली जाईल."


हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

"शनिवारी-रविवारी कडक लाॅकऊडॉन असताना लग्न समारंभ करता येतील का? याबाबत शासनाकडून माहिती घेतली आहे. त्यानुसार यापूर्वी ज्यांचे लग्न ठरले आहेत, मंगल कार्यालय बुक आहे, पत्रिका छापल्या आहेत अशांचेच लग्न होतील. नव्याने लग्न ठरलेल्यांना या काळात लग्न करता येणार नाहीत. लग्नात पन्नास लोकांच्या उपस्थितीचे काटेकोर पालन करावे लागेल. पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल."
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

हमीपत्रामुळे कार्यालयचालक संतप्त
अलंकार पोलीस ठाण्यातर्फे हद्दीतील मंगल कार्यालयचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे पालन न झाल्यास किंवा मास्क न घालता तेथे लोक फिरत असले तर त्यासाठी मंगल कार्यालय चालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्याबाबतचे हमी पत्र पोलीस ठाण्यात जमा करावी लागणार आहे. लोकांनी मास न घातल्यास आम्ही जबाबदार कसे? यापेक्षा आम्ही व्यवसाय बंद करून घरात बसतो, असा संताप काही कार्यालय चालकांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com