#MarriageIssue फसवणूक झालेल्या तरुणी आल्या एकत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे - परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणांबरोबर विवाह करून फसवणूक झालेल्या तरुणी नशिबाला दोष देत, अश्रू ढाळत बसल्या नाहीत. उलट एकत्रित येऊन फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवीत आहेत. न्यायासाठी लढा देत आहेत. यासाठी समीराने पुढाकार घेतला आहे. ‘टुगेदर वुई कॅन’ म्हणत देशातील हजारो महिलांना तिने एकत्र आणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

पोलिस, पासपोर्ट विभाग, राज्य, केंद्र सरकार आपल्याला मदत करेल, पतीला कडक शासन होईल, अशी आशा हजारो जणींना आहे. त्यासाठी त्या मिळून संघर्ष करीत आहेत. 

या तरुणींना माहेरीही राहता येत नाही आणि बाहेरचं जग नीट जगू देत नाही. काही जणी नोकरी करून, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पतीने केलेल्या फसवणुकीमुळे त्यांना समाजात ताठ मानेने फिरता येत नसल्याची खंत त्यांच्या मनात आहे.

समीराने या प्रश्‍नावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांच्याशी ट्‌विटरद्वारे ती संपर्कात होती. त्याच वेळी तिच्याप्रमाणेच फसवणूक झालेल्या १६ तरुणी तिला फेसबुक, ट्‌विटर व अन्य सोशल नेटवर्किंग साइटद्वारे भेटत गेल्या. 

समीरा व रितू यांनी सगळ्यांना एकत्र आणून ‘टुगेदर वुई कॅन’ असा संदेश देत इतर तरुणींनाही त्यामध्ये सामावून घेतले. आता साठहून अधिक तरुणींचा एक ग्रुप तयार झाला असून, या प्रश्‍नावर त्या राष्ट्रीय पातळीवर लढा देत आहेत.

माझे मागील वर्षी कॅनडा येथे राहणाऱ्या भारतीय मुलाशी लग्न झाले. माझ्या वडिलांनी लग्नासाठी ४० लाख रुपये खर्च केले. लग्नानंतर कॅनडामध्ये गेल्यावर पती, सासू व नणंदेने शारीरिक, मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. अखेर १९ फेब्रुवारीला मी भारतात परत आले. जनकपूर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. माहेरी राहणे आता अवघडल्यासारखे होते. 
- शिवाली सुमन, कनकपुरी, दिल्ली 

पंजाब, हरियानात सर्वाधिक फसवणूक
पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये परदेशस्थित मुलांकडून फसवणूक झालेल्या मुलींची संख्या अधिक आहे. पतीविरुद्ध ठोस कारवाई व्हावी, यासाठी आपल्या राज्यामध्ये न्यायासाठी या मुली सध्या धडपडत आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.

Web Title: #MarriageIssue cheating girl crime justice