लेक झाली म्हणून सासरी होत होता छळ; विवाहितेने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे : लग्नानंतर अनेक वर्षांनी पहिली मुलगीच झाली, त्यामुळे घरात आनंद साजरा करण्याऐवजी केवळ मुलगा झाला नाही, म्हणून पती व सासऱ्याने विवाहीतेचा छळ केला. त्यांच्या छळास कंटाळून अखेर विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना पुढे आली आहे. ही घटना 4 नोव्हेंबर 2019मध्ये वडगाव शेरी येथे घडली. या प्रकरणाची चौकशी करून चंदननगर पोलिसांनी महिलेचा पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नयना सतीश लोंढे (वय 27, रा. वाढेश्‍वरनगर, वडगाव शेरी) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप नरके (वय 53, रा. तळेगाव ढमढेरे, शिरुर) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन तिचा पती सतीश लोंढे व त्याच्या 70 वर्षीय वडीलांविरुद्ध चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा मोदींशी तुलना; सोशल मीडियावर भडका

पोलिस उपनिरीक्षक व्हि.एस.शिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी नयना हिचा सतीश लोंढे याच्याशी 2009 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून त्यांना मुलबाळ नव्हते. अनेक वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. नयना यांना मुलगा झाला नाही, तर मुलगी झाली, तसेच अन्य कारणामुळे पती व सासऱ्याने तिला वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली.या सर्व प्रकाराला कंटाळून नयना यांनी चार नोव्हेंबर 2019 रोजी घरातील स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी याप्रकरणी पती व सासऱ्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संबंधीत घटनेची चौकशी करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman commits suicide after domestic violence