पिंपरीत विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

रुपीनगर येथील एका विवाहितेने मंगळवारी (ता. 10) पेटवून घेऊन आत्महत्या केली. शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे तिचे नाव आहे.​शीतल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. ​

पिंपरी : रुपीनगर येथील एका विवाहितेने मंगळवारी (ता. 10) पेटवून घेऊन आत्महत्या केली. शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे तिचे नाव आहे.

शीतल या तीन महिन्यांपूर्वीच पतीसह रुपीनगर येथे राहण्यास आल्या होत्या. पती किरण कामानिमित्त सकाळी मुंबई येथे गेले होते. त्या वेळी त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःला पेटवून घेतले. नागरिकांनी याबाबत चिखली पोलिसांना कळविले.पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

शीतल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman died in Suicide by burning in Pimpri