पिंपरीत तलाक देण्यासाठी विवाहितेचा छळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

तलाक देण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आठ जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पिंपरी : तलाक देण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आठ जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

तलाक देण्यासाठी आरोपी हे फिर्यादी महिलेला वारंवार त्रास देत. शिवीगाळ करण्यासह मारहाणही केली. तसेच नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल केलेला अदखलपात्र गुन्हा मागे घेण्यासाठीही फोनवरून धमकी देत.

पती एत्तेशाम इप्तेखार सय्यद, सासू सगेरा इप्तेखार सय्यद, सासरा इप्तेखार अहमद सय्यद,  दीर जुनेद एप्तेखार सय्यद, नणंद ताबस्सुन नजिर शेख (सर्व रा.मु. पो . नेकनूर, जि. बीड) नानंदावा नजिर शेख, चुलत सासरा जाकेर सय्यद, नणंद हिना सगीर शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman torture for divorce in Pimpri

टॅग्स