married women crime  news
married women crime newssakal

Pune Crime : अनुष्का केतन गावडे या विवाहितीच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू,सासरे, जाऊसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पति केतन गुलाब गावडे, सासरे गुलाब सखाराम गावडे, सासु कल्पना गुलाब गावडे, भाया डॉ.कांचन गुलाब गावडे, जाऊ-डॉ.शुभांगी कांचन गावडे अशी आहेत.

मंचर : अनुष्का केतन गावडे (वय २५ रा.मंचर, मूळगाव बेलसरवाडी-निरगुडसर ता.आंबेगाव) या विवाहित महिलेला मारहाण, शिवगाळ, दमदाटी करून तिला क्रुर वागणूक दिली. तिचा शारीरीक व मानसिक छळ करून तिचे मृत्यूस कारणीभुत ठरल्याच्या आरोपाहून मंचर पोलिसांनी पती, सासू, सासरे, भाया, जाऊ अश्या एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पति केतन गुलाब गावडे, सासरे गुलाब सखाराम गावडे, सासु कल्पना गुलाब गावडे, भाया डॉ.कांचन गुलाब गावडे, जाऊ-डॉ.शुभांगी कांचन गावडे अशी आहेत. अनुष्का यांची आई स्वाती अतुल बांगर (रा.फाकटे ता.शिरूर, मूळ रा.बेल्हे ता.जुन्नर) यांनी मंचर पोलिसांकडे रविवारी (ता.२८) फिर्याद दाखल केली आहे.

“अनुष्काचा विवाह हिंदु रितीरिवाजाप्रमाणे ता.१ एप्रिल २०२१ रोजी मंचर येथे केतन याच्यासमवेत झाला होता. पतीच्या मागणीनुसार प्रापंचिक साहीत्य, दहा तोळे सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर तीला तीन ते चार महीने व्यवस्थित वागविले.

त्यानंतर तिचे पति केतन अनुष्काला “माहेरहून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे घेवून ये” असे म्हणुन तिला दमदाटी करत होते. “माझे आई वडीलांची खर्च करायची परिस्थीती नाही.” असे सांगितल्यानंतर केतन दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत होता.

सदर प्रकार अनुष्का आम्हाला सांगत होती. तिची समजुत काढुन तिला सासरी नांदायला पाठवित होतो. “लग्नात आमचा मानपान निट केला नाही, हुडा दिला नाही. घरातील कामे करता येत नाहीत, तुझ्या माहेरून चारचाकी घ्यायला पैसे घेवून ये नाहीतर आमच्या येथे राहायचे नाही” असे म्हणुन वारंवार सासरच्या मंडळी त्रास देत होती.

बुधवारी (ता.२४) अनुष्का व केतन दोघेजण फाकटे येथे येऊन जेवण करून गेले. त्यानंतर अनुष्काने आम्हाला नेहमीप्रमाणे परत फोन केला नाही. शुक्रवारी (ता.२६) रात्री एक वाजता आम्हाला कळविण्यात आले की अनुष्काची तब्येत बिघडली आहे.

तीला प्रथम गावडे हॉस्पीटलमध्ये अँडमिट केले होते. नंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.आम्ही मंचर उपजिल्हा रुग्णालयात आलो. त्यावेळी अनुष्काचा मृत्यू झाल्याचे समजले. अनुष्काच्या नाकातोंडातुन रक्त व फेस आलेला होता.

तिचे शरीर काळे निळे पडलेले होते.” असे फिर्यादीत नमूद केले आहे.याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी ४९८ अ, ३०४ ब,३१२, ३२३,५०४,५०६,३४ सदर कलमे लाऊन गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com