इंग्रजी येत नसलेच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी - इंग्रजी बोलता येत नाही तसेच काही कामे येत नाहीत म्हणून सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून सारिका ऊर्फ प्रतीक्षा गणेश डांगेपाटील (वय 20) या विवाहितेने गुरुवारी (ता. 12) गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा पती व नंदावा यांना वाकड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

गणेश रमेश डांगेपाटील ऊर्फ पाटील (वय 26, रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी, मूळ रा. पिंपळवाडी, येरमाळा, ता. बार्शी) असे पतीचे तर चंद्रकांत बाबासाहेब डिडवळ (वय 38, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे नंदाव्याचे नाव आहे. तसेच सासू सुरेखा रमेश डांगेपाटील (वय 45) आणि नणंद दीपाली चंद्रकांत डिडवळ (वय 35) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सारिकाचा भाऊ रवींद्र राजाभाऊ गलांडे (वय 21, रा. येळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सारिका व गणेश यांचा विवाह झाल्यापासून संशयित आरोपी सारिकाला इंग्रजी बोलता येत नाही, काही कामे येत नाहीत तसेच छातीजवळ केलेल्या गाठीच्या शस्त्रक्रियेबाबत विवाहाचे वेळी न सांगितल्याने छळ करत होते. त्यांच्या छळाला कंटाळून शेवटी तिने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण सस्ते करत आहेत.

Web Title: married women suicide crime