पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

suicide1.jpg
suicide1.jpg

पुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली.

संगिता सागर थोरात (वय 30,रा.खुळेवाडी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ ज्ञानेश्‍वर लाड(31,रा.पैठण,जि.औरंगाबाद) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती सागर सदाविश थोरात (35,रा.चंदननगर) याच्याविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची बहिण संगिताचा विवाह 2010 मध्ये सागर बरोबर झाला होता. ती सासरी नांदत असताना पती चारित्र्याचा संशय घेऊन तिचा सातत्याने छळ करत होता. तसेच इतर घरगुती कारणांवरुन तिला सतत मारहाण करत, मुलांसह घराबाहेर हाकलून देत होता. या सततच्या छळास कंटाळून तिने राहत्या घरी लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.ए.चाऊस करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com