हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी स्वावलंबी बनावे

कर्वे रस्ता - जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील ५५ वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला.
कर्वे रस्ता - जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील ५५ वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला.

पुणे - सीमेवर लढताना जवान हुतात्मा झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळतो. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या पती हुतात्मा झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे,’’ असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी रविारी येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील ५५ वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा सन्मान करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच हुतात्मा झालेल्या मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, अबोली मोहोरकर, सोनाली सौरभ फराटे, भारत-चीन युद्धापासून आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मालती जगताप यांचाही त्यात समावेश होता.

जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार, कॅप्टन (निवृत्त) सुरेश जाधव, ॲड. इंद्रजितसिंग गिल, वीरपत्नी अबोली मोहोरकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते.

मोहोरकर म्हणाल्या, ‘‘हुतात्मा झाल्यानंतर कुटुंबीयांना सहानुभूती देण्यासाठी अनेक जण भेटतात. पण, कालांतराने हळूहळू ते कमी होते. आर्थिक मदतीची, सहानुभूतीची आम्हाला गरज नसते. परंतु, आपलेपणाच्या भावनेने बोलणारी आणि सोबत राहणारी माणसे हवी असतात.’’ 

या वेळी गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांनी गायन सादर केले. श्रीराम ओक यांनी निवेदन केले. कुर्लेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com