
Massive Action in Bavdhan: Entire Society Committee Disqualified for 5 Years
Sakal
पुणे : कायद्याला केराची टोपली दाखवत पदाला चिकटून बसलेल्या आणि सभासदांच्या हक्कांना पायदळी तुडवणाऱ्या बावधन येथील रिगालिया रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापन समितीचा गैरकारभार अखेर चव्हाट्यावर आला आहे. सहकार विभागाने या प्रकरणी कठोर भूमिका घेत अध्यक्षांसह संपूर्ण १३ सदस्यांच्या समितीची उचलबांगडी केली असून, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही सहकारी संस्थेवर पदाधिकारी होण्यास अपात्र ठरवले आहे. जागरूक सभासदांनी केलेल्या तक्रारीनंतर हा मोठा विजय मिळाला आहे.