
पुणे/कात्रज : कात्रज परिसरातील इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या भूषण एंटरप्रायझेस कंपनीत लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक दुचाकी आणि वाहनांचे सुटे भाग जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही.