गणित विषय अवघड तरी अनिवार्यच

संतोष शाळिग्राम
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सर्वेक्षणातील निरीक्षणे

  • बहुतांश विद्यार्थी गणित विषय समूजन न घेता पाठांतर करून किंवा खूप अभ्यास करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
  • गणितातील संकल्पना नीट न समजल्याने विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाहीत. गणिताची घरी उजळणी खूप महत्त्वाची आहे.
  • गणिताचा विषय सरावाचा आहे; पाठांतराचा नाही. सूत्र पाठ करणे आणि गणित पाठ करणे याच फरक आहे. पाठांतरामुळे गणितात रुची निर्माण होत नाही.
  • नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात गणिताच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच त्यावर भर देण्याची गरज.
  • सर्वेक्षणातून गणित अनिवार्य असावे, असा सूर उमटला असला, तरी या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेची गरज आहे.

पुणे - गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. व्यावहारिक गणित आणि प्रचलित गणित या दोन स्तरांवर हा विषय आणून त्याची भीती घालविता येईल, असा एक मतप्रवाह या सर्वेक्षणातून दिसून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुणे सेवासदन संस्थेच्या वतीने स्मिता कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आणि मनीषा पाठक यांनी हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक अशा बाराशे जणांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यात पुणे, सोलापूर येथील २४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्यात आली आहेत.

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'  

दोन स्तरांवर अभ्यासक्रम हवा
गणित हा विषय कसा असावा, याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली. काही शिक्षकांच्या (२९.४९) मते सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा, तर बहुतांश शिक्षकांच्या (६२.८२ टक्के) मते प्रचलित आणि सामान्य असा दोन स्तरांवर असावा, असे मत नोंदविण्यात आले आहे. व्यावहारिक गणित हा विषय वेगळा असावा, असे मत ३८.४८ टक्के शिक्षकांचे, तर हा वेगळा विषय असू नये, असे मत ५८.९७ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

सामान्यांच्या मते
शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी देखील नववी, दहावीसाठी गणित विषय अनिवार्य असावा, असे मत व्यक्त केले आहे. या बाजूने ७१.५३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले, तर ५.५६ टक्के लोकांनी हा विषय ऐच्छिक असावा आणि ३.४७ टक्के लोकांनी हा विषय बहुस्तरीय असावा, असे मत व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathematics is difficult but inevitable