Swanand Bhore : मिली सेकंदात संगणकीय वेगाने आकडेमोड करणारा 'जिनियस'

गणित विषय हा मुलांच्या डोकीदुखीचा ठरत असतो. परंतु, तेच मनातून केले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहारण म्हणजे स्वानंद भोरे आहे.
Swanand Bhore
Swanand Bhoresakal

कोंढवा - गणित विषय हा मुलांच्या डोकीदुखीचा ठरत असतो. परंतु, तेच मनातून केले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहारण म्हणजे कोंढव्यातील मनसूखभाई कोठारी नॅशनल स्कूलचा विद्यार्थी स्वानंद भोरे आहे. मिली सेकंदात संगणकीय वेगाने तो गणिती आकडेमोड करतो. कितीही मोठी संख्या असूद्यात त्याचा गुणाकार, भागाकार, वजबाकी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ तो अगदी मिलीसेकंदात तोंडपाठ असल्यासारखे सांगतो.

स्वानंदची ही बौद्धिक कला पाहून सर्वजण चकित होतात. एका सेकंदात आपण नीटपणे वाचू न शकणाऱ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरील ५ अंक आणि आरशात बघून ते उलट्या क्रमांकांची बेरीजही स्वानंद करतो. सन १६०० ते २१०० या वर्षांमधील कोणत्याही तारखेसाठी आठवड्याचा दिवस सांगणे, ५ अंकी संख्येला ५ अंकी संख्येने गुणणे असे विविध गुणाकार, १ ते १० हजारापर्यंतचे पाढे काही सेकंदात वेगाने सांगणे अशा कित्येक गणिती क्रिया स्वानंद करतो.

मेंटल मॅथ वर्ल्डकप २०२३ या जागतिक स्पर्धेत ग्रॅन्डमास्टर या प्रवर्गात तो जगात सर्वप्रथम आला होता. टर्की येथे झालेल्या मेमोरियाड वर्ल्ड चॅम्पीयनशिपमध्ये त्याने भारतासाठी २ रोप्यपदके जिंकली आहेत. त्याच्या या यशासाठी त्याचे प्रशिक्षक युजेबियस नोरोन्हा व आनंद महाजन हे नेहमी मार्गदर्शन करत असतात.

बुलेट्स

- मेमोरिअड टर्की वर्ल्ड ओपन चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके

- मानसिक गणित विश्वचषक २०२३ मध्ये जगात प्रथम क्रमांक

- ३०० मिलीसेकंद वेगाने एक अंकी ६०० संख्याची बेरीज आणि ३०० मिलीसेकंद वेगाने दोन अंकी ३०० संख्याची बेरीज अचूक सांगण्यासाठी स्वतंत्र दोनवेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

- आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डसतर्फे सुपर टॅलेंटेड किड अवॉर्ड

- ४०० मिलीसेकंद वेगाने तीन अंकी अशा १०० अंकांची बेरीज करण्यासाठी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड

- जर्मनीतील ज्युनियर मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्डकप २०२३मध्ये अव्वल पाचमध्ये स्थान

- अमेरिकन मॅथ्स ऑलिम्पियाड २०२३मध्ये रौप्य पदक

- सिंगापूर मॅथ्स ऑलिम्पियाड २०२३मध्ये कांस्यपदक

- २०२३मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जगात दुसरा क्रमांक

- २०२२मधील मॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगात दुसरा आणि २०२१मध्ये जगात चौथा

- एमएसओ लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३मध्ये नववा क्रमांक

- अखिल भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३चा विजेता

- दहाव्या नॅशनल क्यूब चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक

प्रतिक्रिया

स्वानंदला मेंटल मॅथसाठी (तार्किक गणित) वेगळे वर्ग लावलेले आहेत. त्यासाठी शनिवारी आणि रविवारी स्वतंत्र वेळ काढावा लागतो. स्पर्धेच्या वेळी तर कसरत असते. मात्र, त्याचे यश बघून मिळणारा आनंद वेगळा असून दिवसातून १२ ते १४ तास त्याचा अभ्यास होतो.

- मीनल आणि राजकुमार भोरे, पालक

स्वानंद वेगळे काहीतरी करत असल्याचे सांगत अभ्यासाकडे दुर्लक्ष करत नाही. त्याच्या स्पर्धा झाल्या की तो पुन्हा जोमाने अभ्यासाला लागतो. त्यामुळे कायम त्याच्या या गुणांचे आम्ही समर्थन करतो.

- वर्षा कोकीळ, मुख्याध्यापक, मनसूखभाई कोठारी नॅशनल स्कूल, कोंढवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com