शिवसेनेचे पालिकेत ‘मटका फोड’ (व्हिडिओ)

महापालिका भवन - धरणे भरली असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोमवारी शिवसेनेने ‘मटका फोड’ आंदोलन केले.
महापालिका भवन - धरणे भरली असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोमवारी शिवसेनेने ‘मटका फोड’ आंदोलन केले.

पुणे - राज्याच्या सत्तेची सूत्रे शिवसेनेच्या हाती येण्याची शक्‍यता असताना पुण्यात मात्र शिवसेना पाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली आहे. धरणे भरली, तरीही पुणेकरांना पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने ‘मटका फोड’ आंदोलन केले. पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी भाजप अयपशी ठरल्याचा ठपका आंदोलनकर्त्यांनी ठेवला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांना रोज पुरेसे पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळित आहे. शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना अपुरे आणि अवेळी पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. याआधी आपटे रस्ता, पोलिस वसाहत, शिरोळे वसाहतीतील महिलांनी पाण्यासाठी आंदोलने केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देऊनही तो झाला नसल्याने सोमवारी पुन्हा रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली थेट महापालिका गाठून आंदोलन केले.

ज्योती काळे म्हणाले, ‘‘आम्हाला गेले सहा महिने पाणी मिळत नाही. त्यावर अनेकदा तक्रारी केल्या. तेव्हा केवळ पाणी दिले जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजूनही फारच कमी पाणी मिळते आहे. रोजच्या कामांवर परिणाम होतो. मात्र, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.’’ दरम्यान, या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रासह जलवाहिन्यांत बिघाड झाल्याने तो विस्कळित झाला होता, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. त्यानंतर देखभाल दुरुस्तीही झाली होती. मात्र, पाणीपुरवठा काही सुरळीत झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com