‘मातोश्री इस्टेट’शी कोहिनूर समूहाची भागीदारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - बांधकाम व्यवसायात अग्रगण्य नाव असलेल्या कोहिनूर समूहाने शहराच्या मध्यवर्ती भागात तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ या शॉपिंग प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी करीत असल्याचे जाहीर केले. याबाबतची घोषणा समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल, मातोश्री इस्टेट प्रा. लि.चे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राधिका बिर्ला या वेळी उपस्थित होते. गोयल म्हणाले, ‘‘महिला वर्गाची खरेदीसाठी आवडीची जागा असलेल्या तुळशीबागेतच ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ शॉपिंग कॉम्प्लेक्‍स साकारत आहे. अत्याधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण असलेल्या फेज दोनमध्ये दीडशे ते ७५० चौरस फुटांपर्यंतची ५० दुकाने उपलब्ध आहेत. येत्या २०२२ पर्यंत ग्राहकांना त्याचा ताबा देण्यात येणार आहे. या वातानुकूलित कॉम्प्लेक्‍समध्ये ग्राहकांसाठी दोन मजली पार्किंग असून, पाचशे दुचाकी आणि दोनशे मोटारी पार्क करण्याची क्षमता आहे. तसेच, फूड कोर्ट, स्वच्छतागृहे, एलिव्हेटर्स आणि एस्किलेटर्स, सीसीटीव्हीची निगराणी ही नवी तुळशीबागची वैशिष्ट्ये आहेत. ज्वेलरी, कॉस्मेटिक्‍स, हॅंडीक्राफ्ट, नित्योपयोगी वस्तू, कपड्यांचे दुकान, ॲक्‍सेसरीज, फुटवेअर, फुड जॉईंट्‌स, बुटिक्‍स असे सर्व व्यावसायिक येथे असतील. ‘युथव्हिले’ या ब्रॅंड अंतर्गत २०२४ पर्यंत ४० हजार बेडची ‘सर्व्हिस्ड हॉस्टेल्स’ उभारण्याचा समूहाचा मानस आहे. तसेच, मारणे यांनी मातोश्री इस्टेट कंपनीच्या माध्यमातून विठ्ठलवाडी, हिंगणे, बाणेर आणि बालेवाडी येथे दहा बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत.

Web Title: Matoshri Estate and Kohinoor Group Participation