...तर मी सैदव लोकांसोबतः पार्थ पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणेः फक्त एका निवडणूकीसाठी नव्हे तर मी सदैव लोकांसोबत आणि लोकांसाठी कार्यरत राहीन, असे ट्विट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व महाआघाडीतील सर्व सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन.'

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर तब्बल पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval loksabha candidate parth pawar comment on twitter about loksabha election lost