...तर मदन बाफनांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

वडगाव मावळ - माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या काँग्रेस प्रवेशाला व त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यास मावळ तालुक्‍यातील काँग्रेस कार्यकर्ते अनुकूल असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी ॲड. खंडूजी तिकोने यांनी दिली. 

ॲड. तिकोने यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले, की माजी मंत्री बाफना व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली होती. बाफना यांच्या काँग्रेस प्रवेशाला ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माउली दाभाडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. यापूर्वी दाभाडे यांच्या प्रवेशाने पक्षाला चांगली ऊर्जा मिळालेली आहे.

बाफनांच्या प्रवेशाची चर्चा अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर गेल्याने विविध पक्षांतील कार्यकर्ते पक्षात प्रवेशास उत्सुक झाले आहेत. त्यामुळे बाफना यांचा प्रवेश झाल्यास काँग्रेस सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल. बाफना पक्षात येत असतील व त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्यांचे एकदिलाने काम करतील. मावळ काँग्रेसच्या वतीने अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही ॲड. तिकोने यांनी दिली.

Web Title: Maval Loksabha Madan Bafana Candidate Congress Politics