Love Affair Turns Deadly
Sakal
पिंपरी : नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणाला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. तरुणावर गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मावळ तालुक्यातील ओझर्डे येथे द्रुतगती मार्गालगत घडला. विकास बाळासाहेब केदारी (रा. ताजे) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अभिजीत संतोष केदारी (वय २६), नितीन ज्ञानदेव केदारी (वय ४२, दोघेही रा. ताजे, ता. मावळ) आणि आकाश भोकसे (वय २६, रा. कुरकुंडी, ता. खेड) यांना अटक केली. गोळीबार करणारा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी किरण केदारी यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.