पुणे/तळेगाव दाभाडे - मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या १० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर राज्य सरकारने मागे घेतले आहे. या निलंबनाविरोधात पुणे विभागातील सर्वच महसूल कर्मचाऱ्यांनी चार दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.