
Maval Rain
Sakal
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शनिवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. काढणीला आलेली फुले, फळभाज्या व पालेभाज्यांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तर हाताला आलेली सोयाबीनसारखी पिकेही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.