आंदर मावळात वारंवार विज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - संततधार पावसाची रिपरिप, जोराचा वारा यामुळे वीज वाहक तारांना हेलकावे बसून आंदर मावळाच्या पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचे झाले आहे. या आठवडयात सतत दोन दिवस वीज नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टाकवे बुद्रुक - संततधार पावसाची रिपरिप, जोराचा वारा यामुळे वीज वाहक तारांना हेलकावे बसून आंदर मावळाच्या पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचे झाले आहे. या आठवडयात सतत दोन दिवस वीज नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

निसर्गाच्या रौद्र रूपापुढे महावितरणही हतबल झाले की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सतत कोसळणा-या पावसात जीवाची पर्वा न करता महावितरणचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी उंच खांबावर चढतात, नादुरूस्त वीज सुरू होते पण ती औट घटकेसाठीच पुन्हा मागचा पाढा सुरू होतो. वारंवार होणा-या तांत्रिक बिघाडामुळे आंदर मावळातील पंचवीस गावापैकी कोणत्या ना कोणत्या गावात वीज पुरवठा खंडीत होणे हे नेहमीचे झाल्याने नागरिक त्रस्त आहे.

महिन्यातून पंधरा गावात वीज नसली तरी वीज बिलाचा भुर्दड सोसावा लागतो अशी ओरड नागरिक करीत आहे. आंदर मावळाचा पश्चिम भाग दुर्गम आणि डोगराळ आहे. वेडया वाकडया वळणाने, दरी खोरे आणि डोंगर उतार,ओढया नाल्यातून वीजवाहक खांब एका गावावरून पुढच्या गावाला गेले आहे.वीजवाहक तारांच्या लगत अनेक झाडे झुडपे वाढले आहे,जोराच्या वा-यात ही झाडे झुडपे तारांवर पडूनही वीज गुल होते.तांत्रिक बिघाड कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधण्यासाठी महावितरणच्या कर्मचारांची दमछाक होते. त्यात हा बिघाड रात्री अपरात्री झाला तर काळोख्या अंधारात दुर्गम भागात पोहचणे ही शक्य होत नाही.त्यात कायमस्वरूपी कामगारांची अपुरी संख्या असल्याने वीज दुरूस्तीच्या कामात अडथळे वाढत जात आहे.भोयरेचे माजी सरपंच बळीराम भोईरकर म्हणाले,"सतत दोन दिवस वीज गायब आहे,त्यामुळे गाव अंधारात तर आहेच, पण मोबाईलचे चार्जिग बंद पडल्याने कम्युनिकेशन होत नाही, नळाला पाणी येत नसल्याने वळचणीचे पाणी प्यावे लागत, गिरणी बंद आहे. महावितरणकडे या बाबत सतत तक्रारी करूनही वीजेचा प्रश्न सुटत नाही.

Web Title: In Maval repeatedly disrupts the supply of electricity