भन्नाट! पुण्यात मेट्रोच्या स्थानकाला मावळा पगडीचा लुक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

मंगळवार पेठ हे पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील सात एलिव्हेटेड स्थानकांपैकी एक आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांना शहराची सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पारंपरिक स्वरूप देण्यात येणार आहे. "मावळा पगडीच्या' प्रेरणेने मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन डिजाईन करण्यात आले आहे. पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

पुणे : वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावरील मंगळवार पेठ स्थानकाला मावळा पगडीचा लुक देण्यात येणार आहे. शहरातील मेट्रोच्या विविध स्थानकांना पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. त्यातंर्गत मंगळवार पेठ स्थानकाची रचना करण्यात येत आहे. 

पुणे मेट्रोचे मंगळवार पेठ स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या स्टेशनला "मावळा पगडी" लुक देण्यात येणार आहे. टेक्ला सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणाऱया जगातील आघाडीचे कॉन्स्ट्रक्टेबल बीआयएम सॉफ्टवेअरला त्याचे श्रेय जाते. टेक्ला स्ट्रक्चर्स हे ग्लोबल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लीडर ट्रिम्बलचे फ्लॅगशिप कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवार पेठ हे पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील सात एलिव्हेटेड स्थानकांपैकी एक आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांना शहराची सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पारंपरिक स्वरूप देण्यात येणार आहे. "मावळा पगडीच्या' प्रेरणेने मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन डिजाईन करण्यात आले आहे. पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

कोविड-१९ महामारी तसेच लॉकडाऊनच्या दरम्यान पुण्यातील टेलजी प्रोजेक्टस प्रायवेट लिमिटेडला मेट्रो स्टेशनला स्टील स्ट्रक्चर मध्ये डिजाईन आणि तयार करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. कंपनीने मुदतीपूर्वीच काम करीतटेक्लाच्या क्लाऊड-आधारित सहयोग साधनांचा फायदा घेतला आणि केवळ २० दिवसांत हा प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यात फक्त २ अभियंता कार्य करीत होते. केंद्र सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी बीआयएमला आदेश दिले आहेत, आणि स्ट्रक्चरची गुंतागुंत लक्षात घेत अचूक आणि रचनात्मक मॉडेलसाठी आम्ही केवळ टेक्लावर विश्वास ठेवू शकतो, असे टेलजी प्रोजेक्टचे टीम लिडर व्रजेश लाड यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

मावळा पगडी  डिझाईनची अचूक अंमलबजावणी करतांना डिझाईन आणि इंजिनियरिंग टीमला कठीण काम पार पडावे लागले. ज्या वेळी टेलजी प्रोजेक्ट टीमने या प्रोजेक्टचे काम सुरु केले तेव्हा या प्रोजेक्ट्चे बांधकाम सुरु होते आणि इतर टीमने आधीच काम सुरु केले होते ज्यामुळे टेलजी टीमला इतर भागधारकांसह  सहकार्य करीत काम करावे लागले. या प्रोजेक्टचे काम इतर टीमद्वारे आधीच सुरु झाले होते, त्यामुळे अशा प्रोजेक्टवर काम करणे अधिकच आव्हानात्मक होते.

एका अभूतपूर्व जागतिक महामारीमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान टेलजी प्रोजेक्ट समोर  या असाईनमेंटची अंमलबजावणी करणे हे सगळ्यात मोठे आवाहन होते. सुरु झालेल्या प्रोजेक्टवर काम करणे हा टेलजी टीमचा पहिलाच अनुभव होता. कोणतीही पूर्वतयारी न करता, टेलजी प्रोजेक्टला हा प्रकल्प उपलब्ध मर्यादित संसाधनांसह आMavala Pagdi look for the metro station at mangalwar peth in Puneणि अत्यंत कमी वेळेत अचूकपणे पूर्ण करावा लागला. टेक्ला  मॉडेल शेअरींगमुळेच आम्हीच आमच्या ऑफिसमधून कार्यक्षमतेने कार्य करणे चालू ठेवू शकलो असे लाड यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी
 

उत्कृष्ट डिजाईन आणि इंजीनियरिंग कौशल्याची मागणी करत अत्यंत कमी मुदतीवर आणि जागतिक महामारी आणि लॉकडाऊनमध्ये मध्ये असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला असे, पॉल वॉलेट,रिजनल डायरेक्टर, ट्रीम्बल सोल्युशन, इंडिया अँड मिडल ईस्ट म्हणाले. टेलजी प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड ही एक आयएसओ (टीयूवी-एसयूडी) ९००१-२०१५ प्रमाणित स्ट्रक्चरल इंजिनियरिंग सर्विस अँड सोल्युशन्स  कंपनी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mavala Pagdi look for the metro station at mangalwar peth in Pune