‘मॅक्‍स फॅशन आयकॉन’ बनण्याची सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - आपल्या कपड्यांच्या असंख्य स्टाइल्सने लोकांना भुरळ पाडणारा ब्रॅन्ड ‘मॅक्‍स फॅशन’ व ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘मॅक्‍स फॅशन आयकॉन २०१८’मध्ये सहभागी होण्याची संधी तरुणी व महिलांना मिळणार आहे. हा ‘फॅशन शो’ १ सप्टेंबर रोजी (शनिवार) स्वारगेट परिसरातील कुमार पॅसिफिक मॉल येथे होणार आहे. ‘फॅशन शो’ची ऑडिशन (प्राथमिक फेरी) सकाळी ११ ते दुपारी १ व अंतिम फेरी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत होईल. 

फॅशन इंडस्ट्रीने नेहमीच सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. वेगवेगळे ‘फॅशन शो’ पाहताना एकदा तरी ‘रॅम्प वॉक’ करावा, अशी सुप्त इच्छा असणाऱ्या महिलांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याची मोठी संधी ‘मॅक्‍स फॅशन आयकॉन’च्या निमित्ताने मिळणार आहे. हा शो १८ ते २५ वर्षे  व २६ ते ३५ वर्षे, अशा दोन वयोगटांत होणार असून, डेनिम राउंड, एथनिक राउंड (पारंपरिक पोशाख) व प्रश्‍न-उत्तरे अशा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. ऑडिशनसाठी आत्मविश्‍वास व सर्वांगीण व्यक्‍तिमत्त्वाचा विचार होईल. ऑडिशनमधून निवड झालेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होईल. दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन, असे एकूण चार विजेते घोषित करण्यात येणार आहेत.

 काय - मॅक्‍स फॅशन आयकॉन २०१८ 
 कोठे - कुमार पॅसिफिक मॉल, स्वारगेट  कधी : १ सप्टेंबर २०१८
 केव्हा - ऑडिशन - स. ११ ते दु. १ व अंतिम फेरी : सायं. ६ ते ८

नोंदणीसाठी   
 ठिकाण - विमाननगर, मगरपट्टा पार्क टाऊन, अमानोरा पार्क टाऊन, औंध, स्वारगेट, पिंपरी, उंड्री, कोरेगाव पार्क येथील सर्व मॅक्‍स स्टोअर्स
 नोंदणी शुल्क - प्रत्येकी रु. १०० (ऑडिशनसाठी नोंदणी आवश्‍यक)
 नोंदणीची वेळ - दुपारी १२ ते रात्री ८
 अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

Web Title: Max Fashion Icon show