महापौरपदाचा उमेदवार भाजप आज जाहीर करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - महापौर, उपमहापौरपदाचा आणि महापालिकेतील गटनेतेपदाचा निर्णय  आज (ता. 6) जाहीर करणार असल्याचे भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी जाहीर करण्यात आले. 

भाजपतर्फे निवडून आलेल्या सदस्यांची बैठक रविवारी झाली. त्यासाठी पक्षातर्फे निरीक्षक म्हणून खासदार सुभाष देशमुख उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे आदी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत देशमुख यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच आमदार आणि खासदारांशीही व्यक्तिशः चर्चा केली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, ""आजच्या बैठकीत खासदार, आमदार आणि नगरसेवकांशी चर्चा केली आहे. चर्चेनंतर एकत्रित अहवाल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. त्यानंतर पक्षाचे शहरातील नेते आणि प्रदेशचे नेते सहमतीने महापौर, उपमहापौर आणि गटनेत्याचे नाव सोमवारी जाहीर करतील.'' बैठकीत कोणीही स्वतःला पद हवे, अशी मागणी केली नव्हती. तसेच काही जणांना पदांची संधी द्यावी, यासाठी एकमेकांची नावे सांगण्यात येत होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या वतीने धीरज घाटे, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, वृषाली चौधरी, जयंत भावे आणि मारुती तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी मुरली मोहोळ होते. गोगावले यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. 

श्रीनाथ भिमाले गटनेते? 
महापौरपदासाठी मुक्ता टिळक, उपमहापौरपदासाठी नवनाथ कांबळे, गटनेतेपदासाठी श्रीनाथ भिमाले यांची नावे निश्‍चित झाल्याची चर्चा बैठकीनंतर उपस्थितांत सुरू होती; मात्र याबाबतचा निर्णय सोमवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, मुरली मोहोळ यांच्यात चुरस आहे. महापौरपदाच्या निवडीनंतर त्याचा निर्णय होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Mayor candidate of the BJP will announce today