सिंहगड रस्ता परिसरातील नाल्याबाबत महापौरांनी दिल्या `या` सूचना

sinhgad road1.jpg
sinhgad road1.jpg

सिंहगड रस्ता (पुणे) : नाला मोकळा करणे, पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, नाल्यावरील ओढ्यावरील अतिक्रमणे काढणे, प्रवाह कोठेही बाधित होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्यावतीने सिंहगड रस्ता भागातील ओढ्या नाल्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, शंकर पवार, यांच्यासह मनपा आयुक्त शेखर गायकवाड , उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,  सभागृहनेते धीरज घाटे, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता प्रवीण गेडाम, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आयुक्त संभाजी खोत, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

यावेळी नागरिकांनी ओढा तसेच नाल्या संदर्भात असलेल्या समस्यांचा पाढा महापौरांचा समोर वाचला. पु. ल. देशपांडे उद्यान येथील ओढा विश्रांती नगर चौकातील सेंट झेवियर शाळेजवळील ओढा माणिक चौकातील ओढा या सर्व यांची पाहणी केली याबाबत संबंधित सर्व विभागांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com