पुण्याच्या महापौर आपल्या दारी

संदीप जगदाळे
शनिवार, 19 मे 2018

हडपसर - नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी विविध समस्यांबाबत महापौर व अधिका-यांना धारेवर धरले. प्रलबिंत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी संबधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या. सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री अकरापर्यंत सुरू होता.

नागरिकांनी यावेळी ससाणेनगर रेल्वे फाटक येथे भुयारी मार्ग अथवा रेल्वे उड्डाणपूल उभारावा, परिसरात नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा, काळेपडळ येथील मोकट कुत्री व डुकरे यांचा बंदोबस्त करावा, पालिकेचे अधिकृत वाहनतळ उभारावे, भाजी मंडई व विविध रस्त्याकडेला अनअधिकृतपणे बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी, मुंढवा येथील सर्वोदय कॅालनीतील अंतर्गत रस्ते रूंद करावेत, केशवनगर येथील अतिक्रमणे व बांधकामे वाढत असून त्यावर अंकुश ठेवावा, उघडयावर कचरा जाळला जातो, याला प्रतिबंध घालावा, पीएमपीएल डेपोतील उघडयावर ठेवलेल्या टायरमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले. 

शिवाजी चौकात वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलिस व सिग्नल बसवावा, गाडीतळ येथील साईनाथनगर येथील पावसाळी लाईन नादूरूस्त झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते, काळेपडळ येथे एकाच वेळी तीन खात्याची कामे सुरू असून खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, शिंदेवस्ती येथील म्हशींचा गोठा हलवावा, गाडीतळ येथील अवैध लक्झरीबस थांबा स्थलांतरीत करावा, पारगेनगर येथे रस्त्यावर गॅरेज थाटल्यामुळे नागरिकांना चालता येत नाही व उघडयावर मटण विक्री केली जाते. प्रभाग क्र २२ मधील नक्षत्र उदयाना शेजारील रखडलेल्या डीपी रस्त्याचे काम मार्गी लावावे, अवैध रिक्षा थांबे हटवावेत अशा प्रश्नांकडेही नागरिकांनी महापौरांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी नगरसेवक मारूती तुपे, नंदा लोणकर, योगेश ससाणे, उज्वला जंगले, उपआयुक्त ज्ञानेश्र्वर मोळक, सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 
 
Web Title: mayor of Pune had a conversation with Citizens