निगडी उड्डाणपूल 1 मेपर्यंत सुरु करण्याचे महापौर यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

सह शहर अभियंता श्रीकांत सवने यांनी ''शहराचे प्रवेशद्वार असल्याने व भविष्यातील पावसाळा, पालखी आगमन, वाहतूक वळण, व नागरिकांच्या अडचणीचा विचार करता प्रकल्प महापौरांच्या आदेशानुसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व नियोजन करण्यात येत आहे," असे सांगितले.

पिंपरी : महापौर उषा ढोरे यांनी निगडी भक्ती शक्ती चौक येथील दुमजली उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा सोमवारी घेतला. पुलाचे काम १ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. याकरिता ठेकेदाराने तीन पाळीमध्ये काम करावे. तसेच अधिकाऱ्यांनी त्यानुसार नियोजन करून दर १५ दिवसांनी  अहवाल द्यावा, अशाही सूचना दिल्या.

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...

यावेळी सत्तारूढ  पक्षनेते एकनाथ पवार स्थानिक नगरसेवक शसचिन चिखले , उत्तम केंदळे, अमित  गावडे, नगरसेविका सुमन पवळे,  कमल घोलप, शर्मीला बाबर उपस्थित होते.

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल 

सह शहर अभियंता श्रीकांत सवने यांनी ''शहराचे प्रवेशद्वार असल्याने व भविष्यातील पावसाळा, पालखी आगमन, वाहतूक वळण, व नागरिकांच्या अडचणीचा विचार करता प्रकल्प महापौरांच्या आदेशानुसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व नियोजन करण्यात येत आहे," असे सांगितले.

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor's order to start a nigadi flyOver by May 1