‘एमबीए’ प्रवेशासाठीच्या कॅट परीक्षेविषयी चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

अधिक माहिती...
कधी - रविवार (ता. २८), वेळ - सकाळी १० ते १२
कुठे - एपीजी लर्निंग, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे. 
प्रतिव्यक्ती शुल्क - १५० रुपये.
संपर्क - ९१३००७०१३२
संकेतस्थळ - www.apglearning.in

पुणे - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)सोबतच भारतातील इतर एक हजारपेक्षा जास्त मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट (सीएटी) ही संगणक आधारित परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, वर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रीजनिंग यासंदर्भातले प्रश्‍न कॅट परीक्षेमध्ये विचारले जातात. दोन पातळीवर ही निवड प्रक्रिया होते. लिखित परीक्षा (सीएटी) आणि जीडब्ल्यूपीआय (समूह चर्चा/लिखित क्षमता चाचणी/वैयक्तिक मुलाखत). २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारी कॅट परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘आयआयएम’मध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न असल्यास व परीक्षेविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्यास रविवारी (ता. २८) सकाळी १० ते १२ या वेळेत एपीजी लर्निंग येथे होणारे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअरच्या संधी, CAT, XAT व SNAP आदी परीक्षांसाठीची तयारी, उपलब्ध महाविद्यालये आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया, याबाबत माहिती दिली जाईल व परीक्षा पद्धतीचे संपूर्ण विश्‍लेषण केले जाईल. शेवटी प्रश्‍नोत्तरे होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA Admission CAT Exam Seminar