'सीईटी'न देता एमबीए प्रवेश; 'एआयसीटीई'चा निर्णय

ब्रिजमोहन पाटील
Friday, 21 August 2020

महाराष्ट्राची 'एमबीए सीईटी' झाली असून, त्याचा निकाल ही जाहीर झाला आहे. मात्र कोरोना लाॅकडाऊनचा फटका अनेक अभ्यासक्रमांच्या 'सीईटी'ला बसला आहे. काही परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. तर, काहींना विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीत.

पुणे MBA Enterance Exam : 'कोरोना'मुळे अनेक विद्यार्थी एमबीएची प्रवेश परीक्षा देऊ शकले नसल्याने त्यांना पदवीच्या गुणांवर थेट प्रवेश देण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) (MBA CET) घेतला आहे. मात्र, शुल्क व इतर नियमांचे पालन होणार का? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. देशभरात 'एमबीए', 'पीजीडीबीएम' या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मॅट, कॅट, सीमॅट, जीमॅट, ऍटमा यासह इतर प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रात शासनातर्फे 'एमबीए सीईटी' घेतली जाते. 'कोरोना'मुळे मार्च महिन्यापासून शैक्षणिक वेळपत्रक कोलमडून गेले आहे.

शिक्षण विषय इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राची 'एमबीए सीईटी' झाली असून, त्याचा निकाल ही जाहीर झाला आहे. मात्र कोरोना लाॅकडाऊनचा फटका अनेक अभ्यासक्रमांच्या 'सीईटी'ला बसला आहे. काही परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. तर, काहींना विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून 'एआयसीटी'ने  पदवीच्या अंतीम वर्षाच्या गुणांवर प्रवेश दिला जावा असा निर्णय घेतला आहे. 'एआयसीटीई'चे सदस्य प्रा. राजीव कुमार यांनी हे परिपत्रक काढले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिलेल्या आहेत, नियमानुसार त्यांना प्राधान्याने प्रवेश दिला लावा. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर  रिक्त राहिलेल्या जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली नाही अशांना पदवीच्या अंतीम वर्षाच्या गुणांवर प्रवेश देता येईल. प्रवेश देता येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, "सीईटी दिल्याशिवाय एमबीए'ला प्रवेश मिळतो नाही. मात्र, यंदा कोरोना'मुळे अनेकांना परीक्षा देता आली नाही, त्यांना पदवीच्या गुणांवर प्रवेश मिळू शकतो. ही सवलत केवळ या वर्षी पुरती मर्यादित आहे."

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साधारणपणे १५ टक्के जागा रिक्त
‘एमबीए’च्या दरवर्षी किमान १५ टक्के जागा रिक्त रहात आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील १०५  संस्थांमध्ये १३ हजार ३६५ प्रवेश क्षमता होती. त्यापैकी ११ हजार ५२७ जागांवर प्रवेश झाला होता. यंदा सीईटी शिवाय प्रवेश मिळणार असल्याने रिक्त जागांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mba admission without entrance exam aicte decision