₹1.26 Crore MBBS Admission Scam Uncovered in Pune
पुणे : जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात ‘एमबीबीएस’ या वैद्यकीय पदवीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील दोन भामट्यांनी चंद्रपूर येथील एका मुलीच्या पालकासह १३ जणांना तब्बल १ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण किशोर हलकरे (वय ५२, रा. रामनगर, चंद्रपूर) यांनी तक्रार दिली.