एमसीएची प्रवेशप्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता.२५) ऑनलाइनअर्ज भरता येणार आहे. १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोडसह अर्जाची पडताळणी करायची आहे.

पुणे - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता.२५) ऑनलाइनअर्ज भरता येणार आहे. १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोडसह अर्जाची पडताळणी करायची आहे.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये एमसीएला प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होईल. या यादीवर १४ ते १६ जुलैदरम्यान आक्षेप घेता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर होईल. 

सरकारी आणि खासगी महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा १७ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org आणि www.dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क साधावा.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज, कागदपत्रे अपलोड, पडताळणी, कन्फर्मेशन मुदत : १२ जुलै
जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे : १२ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी : १३ जुलै
गुणवत्ता यादीवरील आक्षेप : १४ ते १६ जुलै
जातवैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख : १६ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : १७ जुलै
रिक्त जागा जाहीर करणार : २७ जुलै
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : १८ ते २० जुलै
प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे : २१जुलै
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : २२ ते २४ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : २५ जुलै
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : २६ ते २८ जुलै
प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलै
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : ३० जुलै ते १ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : २ ऑगस्ट
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : ३ ते ५ ऑगस्ट
प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : ६ ऑगस्ट
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : ७ ते ९ ऑगस्ट
अतिरिक्त फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : १२ ऑगस्ट
महाविद्यालयांसाठी प्राधान्य अर्ज भरणे : १३ ते १४ ऑगस्ट
प्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे : १६ ऑगस्ट
महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे : १७ ते १९ ऑगस्ट
शैक्षणिक वर्षाला सुरुवात : १ ऑगस्ट
प्रवेशाचा कट ऑफ दिनांक : २५ ऑगस्ट
कॉलेजांना डेटा अपलोड करणे : २६ ऑगस्ट
 

Web Title: MCA admission process from today