esakal | डॉक्टरांच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा MD डॉक्टर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा MD डॉक्टर अटकेत

डॉक्टरांच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा MD डॉक्टर अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावण्याच्या प्रकरणामध्ये एका एमडी डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. संबंधित डॉक्टरनेच छुपे कॅमेरे लावल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. डॉ. सुजीत आबाजीराव जगताप (वय 48) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी, या भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहतात. हा प्रकार 6 जुलैला सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजून 20 मिनिटे या कालावधीत घडला. फिर्यादी मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांनी बल्ब लावण्यासाठी ‘स्वीच ऑन’ केला. मात्र, बल्ब लागला नाही. दरम्यान, तो बल्ब काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला. तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने घरातील अन्य दिव्यांची पाहणी केली. त्यात बेडरूममध्येही असाच बल्ब लावल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्ह्या दाखल केला होता.

हेही वाचा: 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संगीता यादव करीत होत्या. 4 दिवसांपासून पोलिस सीसीटीव्ही तपासण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची देखील चौकशी करीत होते. एका सीसीटीव्ही मध्ये डॉ. जगताप निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिसांनी डॉ. जगताप यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्यास 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image