MEA Expo : मराठा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एमईए एक्स्पो’; प्रतापराव पवार यांच्या हस्ते उद्घघाटन

नवउद्योजकांना उद्योगात भरारी घेता यावी यासाठी ‘मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन’तर्फे दोन दिवसीय ‘एमईए एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे.
Prataprao Pawar
Prataprao Pawarsakal

पुणे - मराठा समाजातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे. त्यांच्यातील नवकल्पना समाजासमोर याव्यात. तसेच नवउद्योजकांना उद्योगात भरारी घेता यावी यासाठी ‘मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन’तर्फे दोन दिवसीय ‘एमईए एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते या एक्स्पोचे शनिवारी (ता. ९) उद्घघाटन करण्यात आले.

एरंडवणेमधील डी. पी. रस्त्यावर असलेल्या सिद्धी गार्डनमध्ये हा एक्स्पो भरविण्यात आला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, समिती सदस्य महेश भागवत, अभिजित जाधव, सायली काळे आणि आश्रम काळे यावेळी उपस्थित होते. पवार यांनी उद्योजकांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

ज्वेलरी, कपडे, बांधकाम क्षेत्र, घरगुती वापराच्या वस्तू, औद्योगिक उपकरणे, सौदर्य प्रसादने, विविध प्रकारच्या कला, बांधकामाची आवश्यक असलेली विविध उपकरणे आणि सजावटीच्या वस्तूंचे सुमारे ७० स्टॉल एक्स्पोत आहेत. यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील मांडण्यात आले आहेत.

वैविध्यपूर्ण वस्तूंचे हे प्रदर्शन रविवारी (ता. १०) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. दोन दिवस पार पडणाऱ्या या प्रदर्शनात विविध सांकृतिक आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि शस्त्र प्रदर्शन देखील आहे.

उद्योगांसाठी सध्या अनेक नवीन क्षेत्र उपलब्ध होत आहेत. या स्थितीचा उद्योजकांनी उपयोग करून घ्यावा. उद्योजकता वाढविण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रत्येक महिन्याला किमान एक हजार रुपये असोसिएशनकडे द्यावेत. यातून काही वर्षांतच ५० ते ७० कोटी रुपये जमा होतील. या पैशाचा वापर आर्थिक सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, नवउद्योजकांना आर्थिक मदतीसाठी आणि नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी होवू शकतो. दरवर्षी किमान १०० लहान-मोठे उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न या पैशातून करावा. आर्थिक मदतीबरोबर प्रत्येकाने यासाठी वेळे देणे तितकेच महत्त्वाचे आहे. नवउद्योजकांना निर्यातीसाठी मदत आणि मार्गदर्शन करावे.

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

रविवारी पुरस्कार वितरण -

‘एमईए एक्स्पो’ निमित्त रविवारी (ता.१०) संध्याकाळी सात वाजता राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि उद्योजक अतुल चोरडिया यांच्या हस्ते उत्कृष्ट महिला उद्योजक, उत्कृष्ट पुरुष उद्योजक, उत्कृष्ट तंत्र उद्योग, उत्कृष्ट स्टार्टअप अशा विविध प्रकारातील उद्योजकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

एमईए एक्स्पोबाबत -

कधी - रविवारपर्यंत (ता. १०)

कुठे - सिद्धी गार्डन, डी. पी. रस्ता, एरंडवणे

वेळ - सकाळी १० ते रात्री १०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com