मेधा कुलकर्णी झाल्या पुन्हा आक्रमक; बेकायदा कारखाना पाडला बंद 

ज्ञानेश सावंत
Tuesday, 29 September 2020

पुण्यातील विशेषत: कोथरूडमधील बेकायदा धंद्यांवर धाडी घालत, ते बंद करण्यास भाग पाडलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकांची झोप उडविलेल्या आणि परवानगीविनाच सुरू ठेवलेला बाणेरमधील सिमेंटचा कारखाना कुलकर्णी यांनी मंगळवारी बंद पाडला.

पुणे : पुण्यातील विशेषत: कोथरूडमधील बेकायदा धंद्यांवर धाडी घालत, ते बंद करण्यास भाग पाडलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकांची झोप उडविलेल्या आणि परवानगीविनाच सुरू ठेवलेला बाणेरमधील सिमेंटचा कारखाना कुलकर्णी यांनी मंगळवारी बंद पाडला. आपल्या या मोहिमेत महापालिकेची यंत्रणाही कुलकर्णी यांनी कामाला लावत, आपल्या राजकीय आणि प्रशासकीय ताकदही सगळ्यांपुढे आणली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाणेर परिसरातील नागरिकांच्या कारखान्याबाबत तक्रारी होत्या. त्याची खातरजमा करूनही महापालिका प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केली. ज्यामुळे यापुढच्या काळात अवैध धंद्यांना थारा मिळणार नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र, जिथे कुठे बेकायदा धंदे सुरू असतील आणि नागरिकांच्या तक्रारी येतील, तिथे मी आणि माझ्या कार्यकर्त्यांचा ताफा धडकेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरुडचे नेतृत्व करीत असताना मेधा कुलकर्णी यांनी स्वत: अवैध म्हणजे, बेकायदा दारू विक्रीचे अड्डे बंद केले. एक-दोन नव्हे डझनभर ठिकाणी त्यांनी कारवाईचा धडाका लावला. त्यावरून कुलकर्णी यांच्यावर राजकीय आरोपही झाले. मात्र, त्याला न जुमानता कुलकर्णी यांनी लोकवस्त्यांमधील दारूचे अड्डे बंद पाडले. त्यानिमित्ताने कुलकर्णी यांची 'स्टाइल' चर्चेत आली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यापासून कुलकर्णी या थोड्याफार शांत राहिल्या. मात्र, आपापल्या भागातील तक्रारी घेऊन लोक आजही त्यांच्याकडे येतात. त्यातूनच बाणेर परिसरात सिमेंटचा कारखाना असल्याचे गाऱ्हाणे गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे आले होते. त्यासंदर्भात कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे कारवाईचा आग्रह धरला होता.

...म्हणून महामेट्रोला जलसंपदा विभागाने पुण्यात ठोठावला दंड ! 

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी कुलकर्णी यांनी स्वत: सिमेंटचा बेकायदा कारखाना गाठला आणि तो बंद केला. एवढेच नव्हे तेथील बेकायदेशीर वीजजोड आणि अन्य सुविधांकडे लक्ष वेधत कारखाना मालकाला धडा शिकविण्याची मागणी केली. कुलकर्णी यांचा पवित्रा पाहून महापालिकेने कारखाना बंद केला आणि दोषींविरोधात कारवाईची पावले उचलली. 

पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची कमाल!

कुलकर्णी म्हणाल्या, ""या भागांत बेकायदा कारखाना सुरू असल्याने स्थानिकांना खूप त्रास होत होता. या कारखान्यातील कामामुळे धूळ आणि आवाजाने लोक हैराण झाले होते. तशा तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा केला आणि प्रत्यक्ष पाहणी करून तो आता बंदही केला आहे. लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात. त्यावर मी लगेचच कार्यवाही करीत असते. यापुढच्या काळात अशा बेकायदा धंद्यांची गय केली जाणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medha Kulkarni became aggressive again; Illegal factory demolished